> मराठी काव्य 'वारी पंढरीची' लेखन प्रा. श्री जनार्दन लक्ष्मण साबळे. ~ Smart Bhasha

मराठी काव्य 'वारी पंढरीची' लेखन प्रा. श्री जनार्दन लक्ष्मण साबळे.

मराठी काव्य 

पंढरी ची वारी सुरू झाली आणि पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ जीवा लागली. 

🚩🚩वारी पंढरीची 🚩🚩

पांडुरंगा पांडुरंगा निघालो आम्ही यंदा 
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||ध्रु||

दिंड्या पताका घेऊन आम्ही धरली ही वाट,
नाचत नाचत पाऊली खेळत मोठा हा थाट 
टाळ मृदुंग सोबत बोले वारीला यंदा,
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||१||

पांडुरंगा पांडुरंगा निघालो आम्ही यंदा 
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||ध्रु||

पालखी ला खिलारी जोड शोभे डौलदार
दोन्ही बाजूंनी चालत राहे भाल- चोपदार,
माऊलीच्या अभंगाची गोडी वारीला यंदा
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||२||

पांडुरंगा पांडुरंगा निघालो आम्ही यंदा 
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||ध्रु||

मोह मायाचा त्याग करुनी विठ्ठल-विठ्ठल नाम 
मुखी बोलूनी, भजनी रंगुनी विसरे अवघे भान,
किर्तनी, भजनी राहुनी आम्ही वारीला यंदा 
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||३||

पांडुरंगा पांडुरंगा निघालो आम्ही यंदा 
तुझ्या दर्शना पांडुरंगा निघालो आम्ही पुन्ह्यांदा ||ध्रु||

*****
काव्य लेखन :- प्रा. श्री. जनार्दन लक्ष्मण साबळे.
मोबाईल नंबर :- 9921762185

Newest
Previous
Next Post »

लोकप्रिय पोस्ट