मराठी कविता
मावळतीचा सूर्य...
मावळतीला जाणारा हा सूर्य आता नकोसा वाटतोय,
कारण उद्या परत इकडेच येण्याचे तो आश्वासन देतोय |
का कुणास ठाऊक त्याला हे सर्व इकडे का आवडतय,
दिवसभर इकडेच जणू काही टक लावून पाहतोय ||१||
भावनेचा उंबरठा ओलांडताना जरा तो घाबरतोय,
कारण वास्तविकतेचा तोरा जरा तो जास्तच मिरवतोय |
बदल निसर्गाचा नियम आहे, असे काही तो सांगतोय,
पण त्याच्या येण्याच्या नियमात बदल करणं तो विसरतोय ||२||
म्हणून कधी-कधी तो जरा मला निर्दयी वाटतोय,
कारण दुसऱ्याला नेहमीच तो उपदेश करतोय |
मंग जरा एकदा तरी कधी बदलून वागतोय?
दिवस-रात्र फक्त दूनियेसाठीच तो जगतोय ||३||
हे जग किती सुंदर आहे तो उघड्या डोळ्याने बघतोय,
कारण तो या जगावर मनापासून प्रेम करणारा भासतोय |
मावळतीला जाणारा हा सूर्य किती निरागस वाटतोय,
अख्या जगाला सांभाळणारा तो एकटाच जग सोडतोय ||४|
त्याचं असं एकट जाणं मनाला वेदना देऊन जातंय,
ऐकावंस वाटतंय कधी, काय त्याच्या मनात चालतंय ||
मावळतीला जाणाऱ्या सूर्याचं रूप इतक एकाकी का दिसतंय,
बसून बोलावं एकदा त्याच्याशी, खरंच काय त्याला वाटतंय ||५||
................
काव्य लेखन :-
प्रा. श्री साबळे जनार्दन लक्ष्मण.
मो. 9921762185.
मावळतीचा सूर्य... |
ConversionConversion EmoticonEmoticon