> मराठी कविता 'भरारी उंच भर' | Bharari unch bhar | प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे. ~ Smart Bhasha

मराठी कविता 'भरारी उंच भर' | Bharari unch bhar | प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे.

मराठी कविता


* भरारी उंच भर *


चालत रहा वाटसरू नको फिरवू पाट,

खडतर या रस्त्यातूनी कोण काढील वाट,

ध्येय तुझे जवळ आहे धीर थोडा धर,

मनगटाच्या बळावरी विश्वास जरा कर ||१||


ध्येया कडे जाणारा रस्ता आता धर,

फुलवायचीय बाग तुला कष्ट थोडे कर,

नशिबावर विसंबनं आता गड्या सोड,

कष्टाला ही प्रयत्नांची आसुदे जरा जोड ||२||


दगडावरी घन मारून तुकडा आता कर,

रखरखत्या उन्हामध्ये सावली आता धर,

अडचणींच्या मानगुटावरी पाय जरा ठेव,

तुझ्या ही अंगणी आनंदाची फुटू दे आता पेव ||३||


चालणाऱ्या पायांची गती तू बन,

निरभ्र आकाशातील ध्रुवाचा तू कण,

धगधगत्या मशालीतील ज्योत तू बन

अंधारातील जीवनाचे उजळू दे कण-कण ||४||


सफलतेचे उंच शिखर सर आता कर,

उंचावरून नजर तुझी दीना वरी धर,

मरण्या आधी गड्या तुझी ओंझळ जरा भर,

अन भरलेल्या ओंझळीची धार दीनी धर ||५||


बुरसटलेल्या विचारांना आता तू सोड,

आपुलकीने सर्वांशी नाते आता जोड,

तूझ्या ही कष्टाला येईल आता यश,

'कामयाबी' शब्दाला ही करशील तू वश ||६||


संकटं ही फार आहे टेंशन घेणं सोड,

'अपयश' हा शब्द आता डोक्यातूनी खोड,

कामावरी लक्ष तुझ केंद्रित थोडं कर,

जिंकायचयं आता तुला भरारी उंच भर ||७||

*****


प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे.

मो. 9921762185

Previous
Next Post »

लोकप्रिय पोस्ट