> मराठी काव्य 'वेणू नादे' | 'Venu Nade' - Janardan sabale| प्रा. जनार्दन साबळे | ~ Smart Bhasha

मराठी काव्य 'वेणू नादे' | 'Venu Nade' - Janardan sabale| प्रा. जनार्दन साबळे |

मराठी काव्य

🚩 वेणू नादे 🚩

माधवाच्या वेणू नादे मन भजनी हे रंगले |
तूच आहे सार्थ आता मन मंदिरी दंगले ||१||

रंग आहे सावळा अन् रूप तुझे गोजिरे |
कांत आहे रुक्मिणी चा चंद्रमुख हे साजिरे ||२||

शिश मुकुट हा मोर शोभतो, अधरी वाजे वेणू|
गळ्यात शोभे वैजयंती, वनात चारी धेनु ||३||

श्याम आहे या रूपाने, राम आहे त्याची रूपे|
बल आहे हा संगतीला, लखन आहे त्या स्वरूपे ||४||

पीतांबर हे केले धारण, द्वारिकाधीश शोभसी |
दीनावरी तू केली माया, सखा सुदामा लाभसी ||५||

अर्जुनाचा सारथी तू, पथ हा त्यासी दाखवी |
गीता ज्ञान हे पूर्ण आहे, अंतर्मना हे जागवी ||६||

कमलसुताचा भाव आहे, हृदयी तूची राहसी |
श्वासा-श्वासा तूनी आता तूची निरंतर वाहसी ||७||

*****

प्रा. श्री.जनार्दन लक्ष्मण साबळे,
तांदुळनेर,
मो. 9921762185.

Previous
Next Post »

लोकप्रिय पोस्ट