🙏😌 चिंतन व्हावे 😌🙏ब्रह्मा समयी चिंतन व्हावे,अंतरीचे रूप प्रकटुनी यावे ||धृ||तुझे रूप आहे किती सुकुमार,नयनांसी आता दर्शन व्हावे ||१||किती दिवसां परी वाट पहावी,विरह तुझा न सोसे जीवाला ||२||कर्मामध्ये गुंतूनी जावे,ध्यान हे अखंड चित्ती वसावे ||३||अहं भाव मनीचे सोडूनी द्यावे,तल्लीन व्हावे राम रुपे ||४||अति क्षीण झाला देह जरी हा,चरणी तुझीया ठाव असावा ||५||अंती चे क्षण जवळी येता,पदरी तुझीया देह निजावा ||६||माझी आकांक्षा पूर्ण व्हावी,तुज रूप आता नयनी दिसावे ||७||अंतरीच्या देवा प्रकटुनी यावे,नयनांसी आता तृप्त करावे ||८||कमलसुताची आर्त हाक,ऐकून घ्यावी हे श्रीरंगा ||९||*******@ जनार्दन लक्ष्मण साबळे,मोबाईल - 9921762185
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
ConversionConversion EmoticonEmoticon