मराठी कविता
माननीय, सन्माननीय, वंदनीय
कै. प्राचार्य इंद्रभान दादापाटिल डांगे (सर)
यांना समर्पित,
साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळस,
ता. राहात, जिल्हा. अहमदनगर.
Dange Sir |
मराठी कविता
🌸 "प्रीति आस्था" 🌸
अध्यापनाचा छंद तुम्हां हा, सरस्वतीचे साधक तुम्ही ||
ज्ञान दानाचा पुण्य वसा हा, तुम्हां कडूनी घेतो आम्ही ||१||
बालकांच्या पाऊल खुणा या, स्वर्गाहूनी उच्च तुम्हा परी ||
निर्भय केले मना-मना या, सौख्य लाभले आम्हा परी ||२||
आस मुलांची सदा नयनी, असुसले मन सर्व काळी ||
चैन पडेना जीवा कदापी, मुले नसता कधी जवळी ||३||
पीयूष पान हे करुनी गेले, संख्या हूनी असंख्य बालके ||
हर्ष मनी हा बहरुनी आला, सुखाऊनी गेले सर्व पालके ||४||
जीवन आपले खर्ची केले, सेवार्थ लेकरांच्या पायी ||
कृतार्थ झाले जीवन त्यांचे, स्मृती मनी बालकांच्या ठाई ||५||
ना उमेद तुम्ही कधी ना झाले, चपळ पणा हा अंगी वसे ||
सामर्थ्या हून सामर्थ्य असे, कर कमली ते तुमच्या दिसे ||६||
काक दृष्टी वरदान तुम्हा ही, सर्वत्र नयन चित्र असे ||
पशु पक्ष्यांची हौस तुम्हा ही, हृदयी त्यांच्या तुम्ही वसे ||७||
कर्क आला धावूनी वेगे, ग्रासू पाहे सामर्थ्याला ||
सामर्थ्यापुढे नमुनी होता, रोग बळावला किती जरी हा ||८||
भिती कुणाची या जगतावर, शोध मनाचा घेत असे ||
विलंब न होता निर्णय झाले, असफलतेची चिंता नसे ||९||
कर्म पाहुनी वंदा, निंदा, अध्यापनाचा तुमचा धंदा ||
भार वाहण्या तत्पर होता, अमृत्मोहत्सवी तुमचा खांदा ||१०||
विचार तुमचे गगनी भिडे हे, 'अल्वेज थिंक हाय' जसे ||
जन्म मिळाला सार्थक झाला, नव चैतन्य सदा जवळी असे ||११||
वंदूनी आले चरण ज्यांचे, आशीर्वाद हा प्रीतिसुधा ||
जीवनातील भय पळूनी गेले, हाती शस्त्र विद्या रस सुधा ||१२||
प्रीति संकुलाचे संस्थापक तुम्ही, इंद्रभान हे नाव असे ||
'दादाजी' तुम्हा म्हणतो आम्ही, विद्या दान हे काम असे ||१३||
संस्कारातून व्हावे शिक्षण, आग्रह तुमचा थोर असे ||
कमलसुताने केले वर्णन, आदर्श हा उच्च असे ||१४||
🌸 काव्य लेखन 🌸
प्रा. साबळे जनार्दन लक्ष्मण.
साध्वी प्रीतिसुधाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळस,
ता. राहात, जिल्हा. अहमदनगर.
मो. 9921762185
Dange Sir |
ConversionConversion EmoticonEmoticon