मराठी काव्य-
बाबा' अर्थात आजोबांना समर्पित
Baba |
🙏बाबा🙏
मर्म कर्म बंध हा भाव जीवाचा,
तनी मनी ध्यानी हा अंश शिवाचा,
अंतरीच्या गाभारी आठवण तुमची,
मनी नाही विसर सर्वकाळ ।।१।।
सचोटी व्यवहारी तुडुंब भरूनी,
परमार्थ प्रपंच सांगड करुनी,
दगड मातीची गाठ जोडुनी,
काकडा, भजनी सर्वकाळ ।।२।।
तुळशी माळ ही गळा शोभूनी,
भगवंताची आस धरुनी,
दुःख सर्व ते बाजूला सारूनी,
आनंदी राहे सर्वकाळ ।।३।।
कष्टाला ही तुमच्या पार नाही,
भूमीला ही तुमचा भार नाही,
हरिपाठ सोडूनी सार नाही,
बोल तुमचे सर्वकाळ ।।४।।
लग्न दारी तुम्हा हौस न्यारी,
मंगलाष्टके म्हणती भारी,
परमार्थी केली पंढरीची वारी,
विठ्ठल पुजी सर्वकाळ ।।५।।
हाथ फिरुनी मुखा वरूनी,
प्रेम-स्नेहे भाव भरुनी,
'भगवान' आशीर्वाद आम्हा देवूनी,
सांभाळीले आम्हा सर्वकाळ ।।६।।
'श्रीरंग' नाम देहास बोलती,
'आप्पा' संबोधे पुत्रसकळ,
नातू, पंतू 'बाबा' म्हणती,
'कुस्ती' आवडी सर्वकाळ ।।७।।
नवमी-दसमी झाली संधी,
काळ वेगे रात्री मंधी,
दोन घंटा झाल्या सरती,
देह ठेविला धरणी वरती ।।८।।
प्रवरासंगमी वाहिली रक्षा,
झाला पुण्य देह समक्षा,
मायाजाळ हा असे प्रपंच,
सांगतसे आम्हा सर्वकाळ ।।९।।
करुनी नेटका प्रपंच आगळा,
गेले निजधामा पितामह,
कमलसुताचा भाव जिव्हाळा,
प्रेमे-भावे सर्वकाळ ।।१०।।
@ प्रा. श्री. जनार्दन लक्ष्मण साबळे. (बाबांचा नातू)
ConversionConversion EmoticonEmoticon