> मराठी कविता 'माझ्या गावची सकाळ'| Majhya Gavachi Sakal- प्रा. साबळे जनार्दन लक्ष्मण ~ Smart Bhasha

मराठी कविता 'माझ्या गावची सकाळ'| Majhya Gavachi Sakal- प्रा. साबळे जनार्दन लक्ष्मण

माझ्या गावची सकाळ

माझ्या गावची सकाळ

 

माझ्या गावची सकळ आहे

                        निराळी-निराळी ||

नाही रेल्वे, कारखान्याचे भोंगे,

   नाही धुराचे ते लोट,

माझ्या गावच्या सकाळी होतो,

  चिमन्यांचा चिवचिवाट ||

 

नाही माणसांची धावपळ,

  नाही गाड्यांची ती गर्दी,

माझ्या गावच्या सकाळी होते,

  मंदिरात आरती ||

 

नाही होत येथे दंगा,

  नाही होत मारहाण,

माझ्या गावच्या सकाळी होते,

  कोकिळेचे ते गाण ||

 

सुंदर वातावरणात येथे सजते सकाळ,

सूर्य दिसतो नभी जसा गुलाब कोमल ||

 

माझ्या गावच्या सकाळी,

फुलते फुलाची ती पाकळी,

माझ्या गावची सकाळ आहे,

निराळी-निराळी ||

जनार्दन लक्ष्मण साबळे

 

Share on :

Previous
Next Post »

लोकप्रिय पोस्ट