* गारवा *
शांत सुंदर सुखद वारा
संगे श्रावणाच्या चंदेरी धारा ||
स्पर्श त्याचा अलगत होता,
बहरून आला परिसर सारा,
रिमझिम-रिमझिम होता-होता,
नंतर टपोऱ्या थेंबांचा मारा ||
शांत सुंदर सुखद वारा
संगे श्रावणाच्या चंदेरी धारा ||
गारांची मंग साथ मिळाली,
वीजांचा तो प्रकाश भारी,
पाण्याची मंग धुंद वेगळी,
वृक्ष, वेली, फुलांची तर मजाच न्यारी ||
शांत सुंदर सुखद वारा
संगे श्रावणाच्या चंदेरी धारा ||
उजळून निघाले चराचर सारे,
आनंदली ही वसुंधरा,
शांत झाले मेघराज अन तुफानी वारे,
उरला फक्त तना-मनात गार वारा ‘गारवा’||
शांत सुंदर सुखद वारा
संगे श्रावणाच्या चंदेरी धारा ||
@ जनार्दन लक्ष्मण साबळे
Share on :
ConversionConversion EmoticonEmoticon