🙏 आरंभी वंदन 🙏
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय,
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय ||
कर्यारंभी शरण आलो वंदन मोरेश्वरा,
दयादृष्टी ही सदैव राहो मजवरी परमेश्वरा ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
भावभक्तीचा गंध लाविला वंदू चिंतामणी,
संकट समयी धावून येशी तूची ध्यानी-मनी ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
कैवारी तू आहे दीनांचा सिद्धि विनायका,
पालन करसी तू भक्तांचे गौरी च्या बालका ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
कर्यामध्ये किर्ती रूपे तूची महागणपती,
रिद्धी सिद्धी ही धाऊन यावी येथे भुवनपती ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
तूची दयाळू तू कनवाळू वंदी विघ्नेश्वरा,
मायेच्या या छत्राखाली देसी तू आसरा ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
सुमनांजली ही अर्पण करीतो चरणी गिरिजात्मजा,
सदनी राहो सुख शांती अन् हृदयी शिवात्मजा ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
तना-मनासी नवी उभारी, वरद विनायका,
भाव मनीचा चरणी तुझिया स्फूर्ती च्या दायका ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
निर्विघ्न हे व्हावे कार्य बल्लाळेश्वरा ,
द्वय कर जोडुनी कमलसुताची भक्ती लंबोदरा ||
विघ्न विनाशक भव दुख हारक जय जय जय गणराय,
आरंभी वंदन माझे वक्रतुंड महाकाय ||
@ प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे
9921762185
ConversionConversion EmoticonEmoticon